कृष्ठरुग्ण सेवेचा उत्तुंग सन्मान : गजानन माने यांना पद्मश्री जाहीर

Views: 612
शेअर करा:

३५ वर्ष कुष्ठरुग्ण सेवेचा केंद्राकडून सन्मानकुष्ठ रुग्ण सेवा या क्षेत्रातील पद्मश्री मिळवणारे गजानना माने महाराष्ट्रतील दुसरी व्यक्ती

निलम चौधरी

कल्याण : समाज जीवनामध्ये देश सेवा हे उत्तम कार्य मानले जाते. लष्करात सैनिकाची भूमिका बजावल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर एखादी व्याक्ती आपले जीवन सर्वस्वीपणे आपले जीवन समाजकार्याला वाहून देत उत्तुंग कार्य करते. अशा व्यक्तीला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. असेच कार्य गजानन जगन्नाथ माने यांच्या रूपाने पाहायला मिळते. आजपर्यंतच्या वाटचालीत विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आता त्याच्या कार्याची केंद्राने देखील घेत “पद्मश्री पुरस्कार” पुरस्कार जाहीर करत त्यांच्या कार्याचा केलेला गुणगौरव ही त्यांच्या उत्तुंग कार्याची प्रचीती देऊन जातो.

गजानन माने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुक्रवारी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माने यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तर आपल्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यामध्ये कुष्ठरुग्णांसोबतच कल्याण डोंबिवली महापालिकेचाही सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया गजानन माने यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. कुष्ठ रुग्ण सेवा करणारे अनेक आहेत. मात्र या क्षेत्रातून पद्मश्री पुरस्कार मिळवणारे डोंबिवलीतील गजानन माने काका हे दुसरे मानकरी ठरले आहेत.

१९९१ साली डोंबिवलीचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी तुम्ही कुष्ठ रुग्णासाठी काम करा असे म्हंटले होते. तेथूनच कुष्ठ रुग्णांच्या सेवेला सुरवात केली. तसेच देशसेवा बजावत असताना अनेक वीर जवान शहीद होत असतात, त्यामुळे सैन्यात भारती होताना अनेकदा घरातून विरोध होत असतो. ‘देश सेवा हीच ईश्वर सेवा’ आहे. देश सेवा करणाऱ्यापासून लांब न करता आतापासूनच मुलांच्या मनात भारतीय सैन्य आणि सेवेची बीजे रुजवणे आवश्यक असल्याचे माने यांनी बोलताना सांगितले.

आता पर्यंतचा प्रवास

नौदलात १२ वर्षे देशसेवा आणि नौदलातून निवृत्त झाल्यावर तब्बल ३५ वर्षे कुष्ठरुग्णांच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा त्यांच्या कडे आहे. १९६२ च्या भारत चीन युद्धाने भारावलेल्या माने  वर्षे  घरी काहीही न कळवता १९६५ मध्ये सैनिक म्हणून भारतीय नौदलात भरती झाले. नौदलातील १९६५ ते १९७६ या कालावधीत १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील सहभागाबद्दल गजानन माने यांना संग्राम मेडलही मिळाले आहे. सैनिकी कार्यकाळ पूर्ण केल्यानतर १९७६ साली त्यांनी ठाणे येथील एका कंपनीत नोकरी पत्करली या कंपनीच्या उत्कर्षात देखील माने यांचा मोलाचा वाटा राहिला. तर १९८५ ला माने डोंबिवलीत राहायला आले आणि मग कुष्ठ रुग्णांच्या सेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला.

कल्याण येथील हनुमान नगर कुष्ठरुग्णांच्या वसाहतीमधील रुग्णांच्या पुनर्वसनाची जबाबदारी माने यांनी आपल्या हाती घेतली आणि त्यांनी ती पूर्ण केली. या रुग्णांना दवापाणी, मलमपट्टी साठी लांब जावे लागत होते. कुष्ठ रुग्ण राहत असलेल्या परिसरामध्ये उपचार वेळेवर मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करत केडीएमसीकडून कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये स्वतंत्र दवाखाना सुरु करुन घेतला. तर या रुग्णांच्या कुटुंबाना रोजगार मिळावा आणि उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी माने यांनी पुढाकार घेत कुष्ठरुग्णांच्या कुटुंबातील २५ ते ३० जणाना केडीएमसीमध्ये नोकरी लावली. तर महिलांना स्वतंत्र रोजगार करता यावा म्हणून शिवण कामाचे धडे दिले. दरम्यान माने यांच्या या कार्याची जपानच्या सासाकावा लेप्रसी फौंडेशनने दखल घेत केलेल्या अर्थ सहाय्यातून वसाहतीमध्ये दुग्ध व्यवसाय सुरु करण्यात आला. या प्रकल्पाला जोडून बायोगॅस प्रकल्पाची निर्मितीद्वारे कृष्ठरुग्णांना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. कृष्ठरुग्णांना व्याधीमुळे कधीही सर्वसामान्यांच्या मदिरात प्रवेश दिला जात नाही म्हणून रुग्णांच्या ईश्वर भक्तीपोटी वसाहतीच्या आवारातच राधाकृष्णाचे मंदिर बांधण्यात आले.

माने यांच्या कृष्ठरुग्ण सेवा योगदानात त्यांची पत्नी स्मिता, मुलगा देवेंद्र आणि योगेंद्र, सुन आर्या आणि रावी यांचे मोलाचे योगदान आहे. कृष्ठरुग्णांसाठी माने यांनी केलेल्या कामची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी शिफारस केडीएमसीने राज्यशासनाकडे विशेष ठरावाच्या माध्यमातून २०१७ मध्ये करण्यात आली होती.

गजानना माने यांचा परिचय

गजानन माने हे मूळचे आंबव देवरुख रत्नागिरी जिल्हयामधले. गेली ३५ वर्षापासुन डोंबिवली मध्ये वास्तव्य करीत आहे. शालेय शिक्षण घेत असतांना १९६२ च्या भारत चीन युध्द मनात घर करून गेले. तेथून मनात एक सैनिक होण्याचा विचार पक्का केले.

घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती म्हणून वयाच्या १४ व्या वर्षी कारखान्यात साफसफाई करणे, चहा आणू देणे, कपबशी साफ करणे इ. कामे करुन घरच्या परिस्थितीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. हे करीत असतांना सैनिक होण्याचा निर्णय एकदम पक्का केला आणि घरी न कळवताच सैन्यात भरती झाले. घरुन खूप विरोध झाला.

माने हे १९६५ साली भारतीय नौदलात भरती झाले. मनात आणलेला पहिला विचार आणि इच्छा पूर्ण केली. सैनिकी कारकीर्दीत १९७१ चे भारत पाकिस्तान युध्दात सक्रीय सहभाग घेतले होते. या युध्दातील कामगिरी बद्दल भारतीय संरक्षण दलातर्फे संग्राम मेडलने सन्मानित करण्यात आले.

१९७६ साली सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर देखील एक विचार मनात करुन ठेवला होता की ? देशेच्या सेवेसाठी सतत काहीतरी जनोपयोगी कार्य करत राहायचे. १९८७ ते १९९५ – डोंबिवली मधील सारस्वत कॉलनी परिसरात पुढाकार घेवुन सतत सात वर्षे पाठपुरावा करुन रेल्वे प्रशासनला रेल्वेखालुन जाणारा २ फूटी नाला बांधण्यात आला. १९९६ साली रेल्वेने गणपती मंदिरसमोर पुल बांधुण्यासाठी पाठपुरावा.

१९९० पासुन समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे कार्य सुरु केले. त्यासाठी हि सुरुवातीच्या काळात घरुन विरोध झाला. परंतू काही काळ गेल्यानंतर माझ्या कामाचे महत्व आणि कुष्ठरुग्णांची व्यथा घरच्यांनी जाणून घेतली आणि तेंव्हा पासून आजपर्यंत घरुन संपूर्ण सहकार्य मिळत आहे. आता कुष्ठ रुग्ण सेवेला ३५ वर्ष झाली आहे.

कुष्ठ रुग्णांचे संपूर्ण पूनवर्सन करण्याचा निर्णय घेतल्यापासून रुग्णांना रोग मुक्त करणे, मोफत औषध पुरवठा, स्वतंत्र दवाखाना, रोगमुक्तांना रोजगार, कुष्ठरुग्णांच्या वसाहतीमध्ये स्वच्छता राखणे, चांगल्या पध्दतीचे रस्ते, भरपूर पाणी पुरवठा, दिवा बत्ती, महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणे, रुग्ण आणि त्यांच्या मूलांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे आणि चांगले शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे, पदवीपर्यंत सर्व विदयार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत करणे, तरुण महिलांना शिलाई मशिन यंत्र वाटप, हस्तकला इत्यादींचे प्रशिक्षण देणे, कुष्ठ रुग्णांच्या २८ मुलाना कल्याण महापालिकेत रोजगार मिळवून दिला. कडोंमपा कडुन संपूर्णपणे विकलांग झालेल्या ६७ रुग्णांना दर महा रु. २५००/- अनुदान, या सर्व कामात माने काकांचा मोलाचा वाट राहिला आहे.

रसाकवा इंडिया लेप्रसी फाउंडेशन, जपान या संस्थेकडुन निधी मिळवुन वसाहती मध्ये दुग्ध व्यवसाय सुरु केला या व्यवसायास सिल्फचे भारतातील कुष्ठरुग्ण अपंग पुनर्वसन उपक्रमाचे पहिले पारितोषक २०११ ला मिळाले आहे. कुष्ठ रुग्णांच्या वसाहतीमध्ये गोबर गॅस प्रोजेक्ट सुरु केला आहे.

१९९२ पासुन २०१३ पर्यंत अखिल महाराष्ट्र कुष्ठ पिडित संघटनेच्या सल्लागार पदाची धुरा सांभाळली. महाराष्ट्रातील कुष्ठरुग्ण आणि त्यांचे कुटूंबिय अशा किमान ४० हजार लोकांच्या पुर्नवसनाचा सतत प्रयत्न सुरु केला याकामी भारताचे उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्य पाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या भेटी घेवून कुष्ठरोगांचे पुनवर्सन व्हावे यासाठी सतत प्रयत्न केले.

कुष्ठरुग्णांच्या प्रत्येक वसाहतीमध्ये स्वतंत्र दवाखाना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ इत्यादींचा पाठपुरावा करणे, रुग्णांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणे, महाराष्ट्रातील कुष्ठ रुग्णांच्या प्रत्येक घरामध्ये एक रिक्षा परवाना देण्यात यावा ही मागणी केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेने माझी गेल्या २० वर्षापासुन सुरु असलेली कुष्ठरुग्णांच्या साठी हॉस्पिटलची मागणी केली होती. ती मान्य होत कुष्ठ रुग्नानासाठी राहत्या जागेत काम सुरु आहे.

२०१३ साली कुष्ठरोग जनजागृती आणि जीवनात चालण्याचे महत्व हा संदेश घेवुन डोंबिवली ते रत्नागिरी ही ४०० कि.मी. ची पदयात्रा करुन जनतेच्या मनातील कुष्ठरोगाबद्दलची भिती दुर करणारा १०० वर्षातील पहिला भारतीय होण्याचा मान मिळविला.

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

संग्राम मेडल १९७१ भारत पाकिस्तान युध्द

·       गुणवंत कामगार पुरस्कार १९९०

·       कुष्ठरुग्ण उत्कृष्ट सेवा पुरस्कार माजी सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र शासन २००२. डॉ. बाबसाहेब आंबेडकर सेवा पुरस्कार इंदौर २०००

·       एक्सलंस परफॉरमन्स अवार्ड रोटरी क्लब, डोंबिवली

·       कुष्ठरुग्ण सेवा पुरस्कार, कडोंमपा ३ वेळा ७. आदर्श डोबिवलीकर पुरस्कार २०१३

·       कल्याण समाज रत्न पुरस्कार २०१४

·       ऑयकॉन ऑफ ठाणे जिल्हा २०१३

·       कुष्ठरुग्ण मित्र पुरस्कार २०१५

·       कुष्ठरुग्ण सेवा कार्य पुरस्कार महाराष्ट्र शासन २०१६.

·       १२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान (समाज पुर्नजिवन) पुरस्कार २०१७.

·       आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०१७ 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत