गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली ६५ कि. मी. अल्ट्रारन… भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी रनर्स क्लॅन फाउंडेशनचा उपक्रम

Views: 484
शेअर करा:

कल्याण : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित, भारतीय सैनिक अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी रनर्स क्लॅन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने एक दौड वीर जवानोंके लिये अशी अल्ट्रा दौड़ गेटवे ऑफ इंडिया येथून २६ जानेवारी  रोजी रात्री १२ वाजता  सुरू होवून डोंबिवली येथे सकाळी ८.३० या समाप्त होणार आहे. सदर ६५ कि.मी ची असून भव्य ऐतिहासिक आणि महाराष्ट्रातील एकमेव अल्ट्रा दौड आहे. देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या आणि देशवासीयांच्या संरक्षण सेवा बजावणाऱ्या सैनिकाप्रती आदर करत ही दौड़ भारतीय सैनिकांना आम्ही समर्पित करत असल्याची माहिती रनर्स क्लॅन फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पत्रकार परुषदेला मंत्री रवींद्र चव्हाण, रनर्स क्लॅन फाउंडेशनचे लक्ष्मण गुंडप, ईश्वर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, एनसीपीए हुतात्मा चौक, पीडिमेलो रोड, शिवडी, वडाळा, सायन सर्कल, चेंबूर,  वाशी बस डेपो, कोपरखैरणे, महापे, शिळफाटा, येथून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम करत गणपती मंदिरहून कॅ. विजयकुमार सच्चान स्मारक येथे सलामी देवून ग्लोब युनाइटेड, उस्मा पेट्रोल पंपच्या पुढे डोबिवली (पूर्व) येथे सकाळी ८.३० वा. मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी धावपटूला परितोषिक वितरण करून सदर दौड समाप्त होईल.

संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यामधील आणखी एक उद्देश म्हणजे डोबिवली कल्याण किंवा पळपासच्या शहरातून भारतीय लष्कर, नाविकदल, वायुदल, निमलष्करी दल, पोलिस, इ. संरक्षण क्षेत्रात भरती होऊ इच्छिणाऱ्या होतकरू तरुणासाठी / तरुणीसाठी भरतीपूर्व प्रक्षिक्षण केंद्र उभा करणे सदर केंद्र उभारणीसाठी निधि जमा करणे. येत्या काळामध्ये पुरेसा निधि उभारून असे भरतीपूर्व प्रक्षिक्षण केंद्र आणि आद्ययावत ग्रंथालय उभा करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

सामाजिक, सांस्कृतिक क्रीडाविषयक कार्य करून त्या माध्यमातून समाजामध्ये देशप्रेम वाढीस लागावे, देशप्रती आपले कर्तव्य जागृत व्हावे, समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याप्रती जागृती निर्माण व्हावी आणि निरोगी व तंदुरुस्त समाज निर्माण व्हावा, नवीन पिढीला शारिरीक कष्टाची व्यायामाची सवय लागावी, त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी आणि डोंबिवली नगरीच्या संस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात रनर्स क्लॅन फाउंडेशनचे योगदान आहे.

या दौड मध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त धावपटू सहभागी होणार आहेत. प्रथमच जागतिक पातळीवरील मॅरेथॉन गाजवणारे कॉम्रेड धावपटू सहभागी झाले आहेत. त्याशिवाय आयर्नमेन मानांकीत धावपटू, अल्ट्रा रनर्स, मॅरेथॉन रनर्स,  उदयोन्मुख धावपटू, तसेच डोंबिवली, कल्याण, ठाणे, पुणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा इ. ठिकाणचे धावपटू, त्याचबरोबर डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, निवृत्त अधिकारी अशी समाजातील विविध स्तरातील लोक सहभागी होत आहेत.

ही दौड यशस्वी करण्याकरिता डोंबिवलीचे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. दौडचा समारोप समारंभ आणि परितोषिक वितरण समारंभ  डॉ. अंजित ओक – सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि अंतरराष्ट्रीय कोमेड्स धावपटू,  नरसिंहन सी के उच्च पदस्थ, गुडरिच मेरीटाइम प्रा. लि. आणि मॅरेथॉनर्स, सुधीर ना अधीक्षक अभियंता एमआयडीसी आणि मॅरेथॉनर्स, माधव सिंग संचालक, ग्लोब डेवलपर्स, लक्ष्मण गुप-मुख्य विश्वस्त, रनर्स क्लॅन फौडेशन, आणि मॅरेथॉनर्स या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत