केडीएमसी मतदार याद्यांमधील घोळाबाबत शिवसेनेने घेतली आयुक्तांची भेट

Views: 183
शेअर करा:

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मतदार याद्यांमधील घोळ कायम असून याबाबत शिवसेना पदाधिकार्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. मतदार याद्या तत्काळ यादी दुरुस्त करून प्रसिद्ध करून जबाबदार दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड, कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील, कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे, माजी महापौर रमेश जाधव, उपशहर प्रमुख मोहन उगले आदींसह इतर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्याअनुषंगाने मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याने शिवसेनेने वेळोवेळी त्यावर सूचना केल्या होत्या. प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर हरकती सूचना देखील घेतल्या होत्या. परंतु प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये आयुक्तांनी आदेश दिल्या नंतर सुद्धा अजूनही काही प्रमाणात घोळ आहे. याबाबत आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. ज्या प्रभागाची रचना करण्यात आली आहे त्या प्रभागातच त्या मतदाराला मतदानाचा हक्क मिळावा. तत्काळ मतदार यादी दुरुस्त करून प्रसिद्ध करावी जेणेकरून त्या मतदाराचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये यासाठी आयुक्तांची भेट घेतली असून यामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत