Views: 372
कल्याण : रविवारी मुरबाड (प) वनपरिक्षेत्र मधील परिमंडळ किशोर मधील मौजे हिरेघर येथे वन्य जीव सप्ताह निमित्ताने स्थानिक ग्रामस्त समवेत जनजागृती सभा घेण्यात आली. वनरक्षक किशोर विनायक पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर वनपाल किशोर, साहेबराव खरे यांनी उपस्थीत ग्रामस्थांना वन्य जीवाचे महत्व विशद करताना वन कायदे /१९२७ तसेच वन्य जीव अधिनियम १९७२ चे कायदे ची माहिती दिली. त्याचप्रमाणे अवैध वृक्ष तोंड, त्यासंबंधी माहिती दिली. शिकार, अतिक्रमण, वन वणवा यावर भाष्य केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी व त्यांचे सहकारी अभी पिल्ले यांनी सर्प विषयी माहिती देताना सर्पाचे असलेले महत्व व त्या बाबत ग्रामस्थांच्या सर्पाच्या विषयी असलेल्या गैर समजुती दूर करून नागरिकांची वाहवा मिळविली. सर्पाविषयी अधिक माहिती देत असताना विविध चित्रा द्वारे सर्प पर्यावरणात किती महत्वाचा आहे याचीही माहिती देताना इतर वन्य जीव निसर्गात टिकून राहाण्यासाठी वन विभागाला सदैव सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी इतर सर्प मित्र प्रवीण भालेराव, साहिल भवर, कृष्णकांत अहिरे यांनी त्याना मोलाचे सहकार्य केले,
या कार्यक्रमासाठी हिरेघर उपसरपंच संतोष शेलार, पोलीस पाटील हिरेघर रघुनाथ शेलार, अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती हिरेघर भाऊ शेलार, ग्रामस्थ दिलीप शेलार यांनी मोलाचे सहकार्य केले. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी वनरक्षक किशोर विनायक पवार, वनरक्षक करवेळे सागर इरोले, वनरक्षक शिरगाव ऋषिकेश मडके उपस्थित राहून विशेष सहकार्य केले. ग्रामस्तांच्या वतीने आभार प्रदर्शन अध्यक्ष संयुक्त वन समिती हिरेघर भाऊ शेलार यांनी केले.



