कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती

Views: 648
शेअर करा:

कल्याण कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती करण्यात आली असून कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ सिधुंदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष पदी संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. रमाकांत चव्हाण रिक्षा संघटना उल्हासनगर पूर्वाश्रमीचे अध्यक्ष रविंद्र सिहं भुल्लर पिकींभाई यांचे निधन झाले आहे. त्यामुळे रिक्त अध्यक्षपदी हरजिदंर सिहं (विक्की) भुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली.  नवनियुक्त पदाधिकारी यांना जनसंपर्क कार्यालयात कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी नियुक्ती पञ दिले.

याप्रंसगी युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य प्रतिक पेणकर, जितेंद्र पवार, संतोष नवले, रमेशसिहं चौव्हाण, आप्पा कुलकर्णी, गजानन पाटील, मारुती ठोणे, आप्पा मोरे, विजय डफळ, बंडु वाडेकर, बापु चतुर आदी पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर ठाणे जिल्ह्यातील कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ पद नियुक्ती जाहीर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत