खंडणीसाठी खडवलीत बांधकाम व्यावसायिकावर हल्ला

Views: 501
शेअर करा:

कल्याण : टिटवाळा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या खडवली नडगाव येथील बांधकाम व्यावसायिक शैलेश लोणे (नडगाव) यांच्यावर खंडणीसाठी जिवघेणा हल्ला करण्यात आला असून सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.  दरम्यान या सर्व प्रकारानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींवर ३२६ कलम सुद्धा लावण्यात आला असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी दिनेश बेलेकर यांनी दिली आहे. एकंदर टिटवाळा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

याबाबत फिर्यादी कडून सांगण्यात आले की हल्लेखोरांपैकी मुख्य आरोपी सागर चौधरी (दानबाव), अमन लोणे (नडगाव), शेखर मगर, अभिषेक भंडारी, महेश देसले आणि इतर सहकारी यांनी पिस्तूलाचा धाक दाखवत शैलेश यांच्याकडे बांधकाम चालू ठेवायचे असेल तर दरमाह ५० हजार द्यावे लागतील अशी मागणी केली. परंतु शैलेश लोणे हे स्थानिक असल्यामुळे त्यांनी खंडणीची मागणी फेटाळून लावली तेव्हा आरोपींनी शैलेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवसापासून आरोपी सागर, अमन आणि इतर सहकारी आपल्या १७१७ आणि १४३ क्रमांकाच्या चारचाकी गाड्यांमधून  फिर्यादीचा पाठलाग करत असत.

 दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी देखील आरोपींनी फिर्यदीचा पाठलाग केला आणि टिटवाळा शेजारील जयमल्हार धाब्यावर फिर्यादी जेवणासाठी थांबताच त्याच्यावर आपल्या ईतर सहकार्याच्या सोबत, लोखंडी रॉड, फायटर, लाकडी दंडुके यांनी जिवघेणा हल्ला केला. हा संपूर्ण थरारक प्रकार धाब्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यात फिर्यादीला जबर इजा झाली असून, डोक्यात टाके आणि हाताला फ्रॅक्चर झाले आहे. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत