Views: 385
कल्याण : हेल्पींग हॅन्ड फाऊंडेशनच्या वतीने शहापूर तालुक्यातील शेरे ग्रामपंचायत हद्दीतील शेरे आदिवासी वाडीला फराळाचे व वस्तूचे वाटप करण्यात आले. शहापूर तालुक्यातील व वाशिंद शेरे रस्त्यावरील ग्रामपंचायत शेरे हद्दीतील शेरेच्या आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना दिपावली निमित्त भेटवस्तू व फराळाचे वाटप पुणे येथील हेल्पींग हॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने ठाणे जिल्हा शाखेचे कमिटी उपाध्यक्ष गणेश भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. फाऊंडेशनने याच परिसरातील तीन वाडया दत्तक घेतल्या आहेत.
हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गणेश भोईर यांच्या वतीने आदिवासी पाडयात दिपावली व भाऊबीज निमित्त मुंबई, कल्याण, शहापूर, मुरबाड येथील गोरेगांव आदिवासी पाडयात व अनेक कातकरी पांडे मुलांना फराळ, फटाकडया, महिलांना भाऊबीज निमित्त साडी भेट म्हणून देण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ही दिपावली गरजवंतांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळेस शहापूर शेरेगांव व कल्याण, मुरबाड, पुणे, अंबरनाथ, बदलापूर येथील मुळशीतील अनेक पाडयात कार्यक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्ष किरण जाधव यांनी केले. यावेळेस संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भाईर, मोहन पाटील, किरण दिंडे, प्रकाश भोईर, रमेश पाटील, सारिका पाटील, सावित्रीबाई पाटील, प्रतिभा मढवी, खुशाल भोईर, जगदीश जोशी, संदीप जोशी, संजय ठाणगे, पांडुरंग डोंगरे, जयवंत राव, गुरुनाथ भंडारी, भास्कर संभू, विनायक डोंगरे, विजय तरे, विकास डोंगरे, करण साळुंके, आदित्य ढवळे, देवदास गोंडे, करण गंगावणे, बाळासाहेब पोटे, मनोहर सिंह, बालाजी कांबळे, संतोष जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.



