गोणीत मतदान ओळखपत्रे सापडल्या प्रकरणी बिएलओंना बजावल्या नोटिसा

Views: 659
शेअर करा:

कल्याण : कल्याण शीळ रोडवरील पिसवली कमानी जवळ गोणी भरून मतदान ओळखपत्रे सापडली होती. यानंतर एकच गोंधळ उडाला असून, राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्या नंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ  यांना वैयक्तिक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ७२० जुनी मतदार ओळखपत्रे व ५ शैक्षणीक कागदपत्रे बेवारसपणे आढळून आली. त्याबाबत प्राथमिक चौकशी पोलीस विभाग व निवडणूकविभाग यांनी केली असून घडलेल्या घटनेबाबत निवडणूक विभागाने शुक्रवारी मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत सुरु आहे.

यामध्ये आढळून आलेली शैक्षणीक कागदपत्रे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची शाळा क्र. १९, नेतिवलीशी संबंधित आहेत. तसेच आढळून आलेली बहुतांश मतदार ओळखपत्रे ही १४४- कल्याण ग्रामीणविधानसभा मतदार संघामधील आहेत. त्यापैकी ६७९ ओळखपत्रे ही सन २००६ ते २०१४ या कालावधीतीलव जुनी आहेत. तसेच ४१ ओळखपत्रे ही स्मार्ट कार्डस असून ती सन २०१७ ते २०२१ या कालावधीतील आहेत.  

संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांच्या विरुध्द निवडणूक कार्यालया मार्फत वैयक्तिक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची शाळा क्र. १९ नेतिवली येथील शाळेतील रद्दी वजा कागदपत्रे एका टेम्पोमध्ये वाहतूक केली जात असताना त्या मधील एक गोनी रस्त्यामध्ये पडली. ती मानपाडा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली व त्यानंतर पोलीस विभागाने ती रेकॉर्डवर घेऊन पुढील कार्यवाही केली असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत