Views: 656
केडीएमसी क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील एका धोकादायक इमारतीच्या सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत शाळेत जाण्यासाठी इमारतीखालील रस्त्यावरून जाणारी आठ वर्षीय मुलगी आणि तिची आई किरकोळ जखमी झाली. सुदैवाने जिवितहानी टळली.
शुक्रवार पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील मौलवी कँम्पाऊन्ड मधील मुन्ना मौलवी चाळ तळ अधिक ४ मजली इमारतीच्या सज्जाचा काही भाग शनिवारी सकाळी कोसळल्याच्या घटनेत रस्त्यावरून शाळेत जाणरी आठ वर्षीय मुलगी आणि तिची आई किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.
कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहचत मदत कार्य सुरु करीत संदर्भीत धोकादायक इमारतीतील सुमारे ३२ ते ३५ कुटंबाचे स्थालतंर तात्पुरता स्वरूपात बीएसयुपी योजनेतील रिकाम्या सदनिकेत करण्याचा कामाला गती दिली असल्याची माहिती नोडल आँफिसर धर्यशील जाधव यांनी दिली.
दरम्यान दरवर्षी प्रमाणे सी १ सी २ इगतवारीनुसार धोकादायक, अतिधोकादायक इमारतीची यादी पावसाळ्यापूर्वी मनपा जाहीर करते. पंरतु ठोस प्रभावी अंमलबजावणीचे घोडे पेंड खात असल्यामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याच्या चर्चा यानिमित्ताने सर्वसामान्य वर्गात रंगल्या असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत होते



