चिकनघर गावठाण मध्ये शिवजयंती उत्सव साजरा

Views: 744
शेअर करा:

कल्याण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार असलेली जयंती चिकनघर गावठाणचे शिवसैनिक संकेश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांसह महाराजांना मानवंदना देण्यात आले.

गेली दोन वर्ष निर्बंधांमुळे शिवजयंती साजरी कण्यात आली नव्हती. आता निर्बंध शिथिल झाले असल्याने छत्रपती शिवाजी माह्राज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चिकनघर गावठाण तर्फे साजरी करण्यात आलेल्या जयंतीत महिला जिल्हा संघटक विजया पोटे, पालिका ब प्रभाग क्षेत्र संघटक रवींद्र पाटील, पालिका क प्रभाग क्षेत्र संघटक सचिन बासरे, विधानसभा युवा अधिकारी अभिजित बोले, शाखा प्रमुख संतोष भोईर, अनिल जैस्वाल, विवेक विचारे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत