आपच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन ; २५० नागरिकांनी घेतला लाभ

Views: 542
शेअर करा:

कल्याण : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्र ४५ कचोरे गाव येथे आपचे प्रभाग अध्यक्ष अजित सिंह यांनी रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिराला तब्बल २५० नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद देत तपासणी करून घेतली.

नागरिकांना चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळावे असे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. त्यांचे आदर्श समोर ठेऊन कचोरे गावात नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक अजित सिंह यांनी सांगितले. शिबिरात दमा, ब्लड प्रेशर, मधुमेह, इसीजी, नेत्र तपासणी आदी तपासणी ठेवण्यात आले. तसेच नेत्र तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शिबिरात तज्ञांच्या सल्ल्यासह मोफत औषधे देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष ईशाद शेख, कार्यकर्ते शफिक शेख, उज्वल सिंह, रोशन राऊल, अनुप सिंह, ब्रिजेश सिंह, गौरव सिंह, सुबोध राम, सुशांत मोनी, सोनू सिंह आदींनी शिबिरात मोलाचे योगदान दिले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत