छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सर्वांसाठीच प्रेरणादायी – आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

Views: 646
शेअर करा:

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी

कल्याण : युगा युगांतरानंतर जन्म घेणारे पराक्रमी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजयांची शौर्यगाथा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जयंतीनिमित्त काढले. महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी हे उद्गार काढले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. यावेळी शासननिर्णयानुसार “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताचे गायन सर्व उपस्थितांमार्फत केले गेले. 

     महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दुर्गाडी किल्या जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महापालिका आयुक्त यांच्या दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस व अर्धकृती पुतळ्यास आणि मुख्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखिल महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या शाळांमधील लहान मुलांनी “उदे ग अंबे उदे” असा गजर करीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बहारदार पोवाड्याचे आणि गोंधळाचे सादरीकरण केले.

     या समयी शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, उपायुक्त स्वाती देशपांडे, अतुल पाटील, धैर्यशील जाधव, विनय कुलकर्णी, प्रशासन अधिकारी विजय सरकटे, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, घनश्याम नवांगुळ, रोहिणी लोकरे शैलेश कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे,  सहा.आयुक्त राजेश सावंत, हेमा मुंबरकर, संजयकुमार कुमावत, सुरक्षा अधिकारी जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित  होता.

     डोंबिवलीतही फ प्रभागाचे सहा. आयुक्त भरत पाटील यांनी मानपाडा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी फ प्रभातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत