कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात स्वीप पथकामार्फत मतदान जनजागृती

Views: 493
शेअर करा:

कल्याण : कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली मॉडेल कॉलेज आणि कमलादेवी महाविद्यालय येथील महाविद्यालयातील  प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदान करणे बाबत आव्हान केले.

त्याचप्रमाणे ट्रिनिटी स्कूल,  महानगरपालिका  शाळा क्रमांक 15, मा दुर्गा विद्यालय,संकल्प विद्यालय, महानगरपालिका शाळा क्रमांक 69, मिलिंद नगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी, पोस्टर चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती केली. याठिकाणी मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली. येत्या 20 नोव्हेंबर रोजी  मतदान करण्याबाबत विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि प्रभात फेरी द्वारे नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, समाधान मोरे, भारती डगळे, शिरीष म्हात्रे उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत