Views: 452
कल्याण : नवीन शिक्षण धोरण भारताचे उज्जवल भविष्य घडविण्याच्या दृष्टीने किती परिपूर्ण आहे. वर्ग अध्यापनामध्ये काय बदल केले पाहिजे ! त्याचे मार्गदर्शन आजच्या आयोजित कार्यक्रमात करण्यात आले आहे. वर्ग अध्यापन माह्त्वाचे. २१ शतकातल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी २१ शतकात पद्धतीने अध्यापन कसे करावे. वर्गात विद्यार्थ्यान काय द्यावे. जेणेकरून विश्वगुरु होण्याचे स्वप्न पाहत आहोत त्यासाठी एक पाउल पुढे टाकू. असे शिक्षणतज्ञ प्राची साठे यांनी आयोजित कार्यक्रमात म्हंटले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना तर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० समजून घेऊया या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पश्चिमेतील हॉली क्रोस शाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. तसेच कल्याण तालुक्यातील विविध शाळांचे संस्था चालक, शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित्त होते. जुनी शिक्षण पद्धती वर्षानुवर्ष पाहत आहोत. त्याच शिक्षण पद्धतीत सर्वांनी शिक्षण घेतले आहे. ती विद्यार्थी केंद्रित प्रणाली होती तरी विद्यार्थी जास्त बोलत नव्हता. विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रणालीला वाव मिळत नव्हता. विद्यार्थ्यांना दिशा दर्शवण्यासाठी हि नवीन शिक्षण धोरण आहे. तसेच विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न, समृद्ध बनवणारी नवीन शिक्षण धोरण आहे. असे महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले.
यावेळी कोकण विभाग सचिव रवी गोसावी, विद्यासेवक पतपेढीची अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांत्री संघटनेचे अध्यक्ष सुधीरभाऊ धागस, विद्या सेवक पतपेढी संचालक तथा जिल्हाध्यक्ष कल्याण तालुका गजानान पाटील, विद्या सेवक पतपेढी संचालक तथा जिल्हा सचिव कल्याण तालुका थॉमसकिशोर शिनगारे, हॉलीक्रॉस शाळेच्या प्राचार्य रेव्ह. सिस्टर बिना, हॉलीक्रॉस प्राथमिक शाळेच्या प्राचार्य सिस्टर अॅनी, तालुका सचिव कल्पेश शिंदे, कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष नवनाथ मढवी, पतपेढीचे कोषाध्यक्ष दुर्जन भोईर, पतपेढी संचालक सुरेश साफडे, संजय कुलकर्णी राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली कार्यवाहक, मातोश्री रखमाबाई गायकवाड शाळेचे माजी प्राचार्य दत्तात्रय दळवी, कल्याण तालुक्याचे मुख्याध्यापक संघाचे सचिव अनिल पाटील, मुख्याध्यापक ओक हायस्कूल धीरसिंग पवार, शारदा मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील, मुख्याध्यापिका विष्णूनगर डोंबिवली सुनंदा बेडसे, गजानन शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव आदी उपस्थित होते.



