जलतरण पटू सानिया शेखला पुढील सरावासाठी आर्थिक मदत करण्याची मनसेची मागणी

Views: 512
शेअर करा:

मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांचे पालिका आयुक्तांना निवेदन

कल्याण : जलतरण क्षेत्रात कल्याण शहराचे नाव उचवणाऱ्या जलतरण पटू सानिया शेखला पुढील सरावासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असून याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

      कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेले खेळाडू विभिन्न क्षेत्रात देशाचा आणि राज्याचे नाव रोशन करीत आहेत. त्यातच कल्याणमध्ये राहणारी पंधरा वर्षांची जलतरण पटू सानिया शेख हिने तर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा नेतृत्व करीत सुवर्ण पदक पटकावले आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः तिचा सत्कार आणि कौतुक केले आहे.

  सानिया सारख्या खेळाडूना सराव करताना लागणारी आर्थिक मदत महापालिकेतर्फे उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून सानिया शेख सारख्या मध्यम वर्गीय खेळाडूना उंच शिखर गाठता येईल अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत