Views: 594
छत्रपती शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक विद्यामंदिर शाळेत दीप अमावस्या साजरी
कल्याण : कल्याण पूर्वेतील छत्रपती शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक शाळेत अत्यंत अनोख्या पद्धतीने दीप अमावस्या साजरी करण्यात आली. दिव्यांची माहिती आणि महत्व कळावे यासाठी आपण शाळेत दीप अमावस्या साजरी करत असल्याचे मुख्याध्यापक भाग्यश्री जोशी यांनी संगीतले.
शाळेमध्ये विविध आकाराच्या व बहुरंगी पणत्या आणि दिव्यांची आरास करण्यात आली होती. तसेच सरस्वतीचे पूजन देखील करण्यात आले होते. विशेष म्हणजे शाळेत पूजनासाठी ठेवण्यात आलेल्या समईना सुंदर साडी नेसवून दागिन्यांनी सजवण्यात आले होते. हि सुंदर अशी समई सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. शाळेतील लहान मुलानी दिव्यांची सजावट पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर विद्यार्थ्यांच्या पालकाना देखील मोह आवाराला नाही.
या कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापक जोशी यांनी मांडली असता दीपिका पवार, समीधा कदम यांनी मेहनत घेत ती प्रत्यक्षात उतरवली. यामध्ये मंगला वाणी, विना नातू, शीतल सोनवाने, सविता बरबडे, ज्योती महाजन आदी शिक्षिकांचे सहकार्य लाभले.



