Views: 443
कल्याण : १ महाराष्ट्र वायु स्कॉर्डन राष्ट्रीय छात्र सेना मुंबई यांचा आठ दिवसीय कंबाईड वार्षिक निवासी शिबिर (सी.ए.टी.सी. – ५२९) भारतीय सैनिक विद्यालय, खडवली तालुका कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनात व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थांचे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तंबाखूच्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे ही या वर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५५०० मुलांपर्यंत जातो.
या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी १ महाराष्ट्र वायु स्कॉर्डन राष्ट्रीय छात्र सेना मुंबईचे ग्रुप कॅप्टन आर. कुमार, ग्रुप कॅप्टन संग्राम नायक, राष्ट्रीय छात्र सेनेच्या २७५ युवकांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.



