मोहने गावठाण स्मशानभूमीत पुन्हा होऊ शकते चोरी

Views: 593
शेअर करा:

स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक उपलब्ध करण्याची मागणी भाजपा मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशील पायाळ यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.

कल्याण : मोहोने गावठाणच्या स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या तीन स्टॅण्डपैकी दोन स्टॅण्डचे काही लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. त्याचे त्वरित दुरुस्ती अक्रून वापरत आण्यात आले आहे. मात्र तेथे पुन्हा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्मशानभूमीत सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी भाजपाने केली असून याबाबत भाजपा मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशील पायाळ यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

मोहोने गावठाणची एकमेव स्मशानभूमी असून त्याची दुरवस्था झालेली होती. प्रेत जाळण्याच्या तीन स्टॅण्डपैकी दोन स्टॅण्डचे काही लोखंडी साहित्य चोरी झाले होते. हि बाब सुशील पायाळ यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याअनुषंगाने नादुरुस्त असलेले स्टॅण्ड दुरुस्त करण्यात आले आहेत. पुन्हा चोरीच्या घटना घडून “ये रे माझ्या मागल्या” हि परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुरक्षारक्षक उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच मोहोने शहर हे भौगोलिकदृष्ट्या खूप विखुरलेले आणि लोकसंख्या असलेले शहर असल्याकारणाने स्मशानभूमीचा आरक्षित भूखंड ताब्यात घेवून त्या भूखंडावर गॅस शवदाहिनीचे निर्माण करण्याची अशी मागणी या पूर्वीच केलेली आहे. त्यामुळे वातावरणाची हानी रोखता येईल व नागरिकांना होणाऱ्या त्रासातून नागरिकांना दिलासा मिळेल.

तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यासाठी पुढील कारवाई करावी व सुरक्षारक्षक नेमून होणारी चोरी व गैरसोय टाळावी असे मत सुशील पायाळ यांनी व्यक्त केले आहे. 

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत