फुटबॉल स्पर्धेमुळे मिळाली युवा खेळाडूंना चमक दाखवण्याची संधी – आमदार विश्वनाथ भोईर

Views: 498
शेअर करा:

कल्याणातील पहिल्या वहिल्या सुपरलीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे रायझिंग स्टार फुटबॉल अकदामीला विजेतेपद

अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या कल्याणातील पहिल्या वहिल्या सुपरलीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे रायझिंग स्टार फुटबॉल अकदामीने विजेतेपद पटकावले. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून आणि युवा सामाजिक कार्यकर्ते ओम प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही दोन दिवसीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

१५ आणि १७ वर्षांखालील अशा दोन गटात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या दोन्ही गटांमध्ये रायझिंग स्टार फुटबॉल अकादमीचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेत एकूण २४ संघाने सहभाग घेतला होता.१५ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात रायझिंग स्टार अकॅडमी कल्याण विरुद्ध यंगस्टार अकॅडमीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रायझिंग स्टार फुटबॉल अकादमीने विजय मिळवला. तर १७ वर्षांखालील वयोगटात सेंट मेरीविरुद्ध कल्याण रायझिंग यांच्यातील अंतिम सामन्याचे विजेतेपदही रायझिंग स्टारनेच पटकावले. 

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला १५ हजार, द्वितीय विजेत्याला १० हजार आणि तृतीय विजेत्याला ५ हजार रुपये रोख, चषक, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कल्याण सुपर लीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेमुळे कल्याण मध्ये प्रथमच फुटबॉल खेळाडू आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली असून शालेय विद्यार्थी- खेळाडू यांच्यासाठी यापुढेही अशाच विविध खेळ स्पर्धेचे आयोजन करण्याची ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. 

या बक्षीस वितरण समारंभास शिवसेना विभाग संघटक मा.नगरसेवक  प्रभूनाथ भोईर, शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले,गणेश जाधव,अंकुश जोगदंड,नितीन माने, जेष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, भिवंडी लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे, सुजित रोकडे, अनंता पगार,भरत भोईर, सतीश भोसले, दिनेश शिंदे, राकेश पाटील, अभय कामल्य, रोशन चौधरी, मेघन सलपी यांच्यासह फुटबॉल खेळाडू फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक लक्ष्मण भांडे सर, सुहास भोपी, आजोयक युवासेना चिटणीस वैभव भोईर, ओम भोईर, तन्मय भोईर, हर्षद भोईर, जित भोईर, तनिष्क भोईर, रोहित कारभारी, संकेत कारभारी, ऋतिक खारूक यांनी परिश्रम घेतले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत