बी. के. बिर्ला महाविद्यालयात एम पॉवर युथोपियाचे भव्य आयोजन

Views: 252
शेअर करा:

कल्याण : बी. के. बिर्ला महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन महोत्सव ‘बिर्लोत्सव’ अंतर्गत, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम.पॉवर या उपक्रमाच्या सहकार्याने ‘एमपॉवर युथोपिया’ चे आयोजन करण्यात आले होते. तरुणांमध्ये मानसिक आरोग्य, जागरूकता, संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या दोन दिवसीय महोत्सवात मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांमधील ६००० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

एमपॉवर आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विशेष मानसिक आरोग्य संस्थानाचे उदघाटन त्यांनी केले. ही स्थापना विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य, सहानुभूती आणि मदतीची उपलब्धता याबद्दल संवेदनशीलता वाढवण्यासाठी एक कायमस्वरूपी हक्काचे व्यासपीठ म्हणून काम करेल. एमपॉवर युथोपिया अंतर्गत, ९०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागासह विद्यार्थ्यांनी चालवलेल्या सर्वात मोठ्या ‘मूड परेड’ साठी अधिकृत जागतिक विक्रम संघटनेसमोर जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

हा कार्यक्रम अधिक चैतन्यदायी बनवण्यासाठी, बिर्लोत्स्सवाच्या मंचावर लोकप्रिय भारतीय बॉय बँड ९ टीनच्या विशेष सादरीकरणाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याने संगीत आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून आशा, सक्षमीकरण आणि मानसिक मनोधैर्य यांचा संदेश दिला. प्राचार्य डॉ अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या महोत्सवाच्या सर्व उपप्राचार्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी संसद परिश्रम घेत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत