मतदार जनजागृती शपथ, शालेय विदयार्थ्यांची रॅली माध्यमातून मतदार जनजागृतीचा जागर

Views: 352
शेअर करा:
कल्याण :  मतदानाबाबतची जागरुकता जनमानसामध्ये अधिकाधिक वाढावी, मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीकोनातून कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव आणि सहाय्यक अधिकारी विजय सरकटे यांच्याव्दारे विविध उपक्रम राबिवले जात आहेत.
यामध्ये महापालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविदयालय यामध्ये चित्रकला स्पर्धा, मतदान जनजागृतीची शपथ असे उपक्रम राबविण्यात आले. त्याप्रमाणे “युवर वोट-युवर पॉवर” “आपले मत – आपली जबाबदारी” अशा आशयाचे फलक हाती घेऊन शालेय विदयार्थ्यांनी आपापल्या शाळेच्या परिसरात मतदान जनजागृतीपर रॅली काढल्या. या रॅलीमध्ये अनेक विदयार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन मतदार जनजागृतीबाबत आपला संदेश नागरिकांपर्यंत/मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रमास आपला हातभार लावला.
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत