रस्ता न झाल्यास पालिकेसमोर अमरण उपोषणाला बसू
आई एकविरा महिला मंडळाचा इशारा

Views: 446
शेअर करा:

कल्याण : गेल्या आठ वर्षापासून सोयी सुविधांची वानवा असलेल्या कल्याण पूर्वेच्या अडवली ढोकाळी भागातील आई एकविरा महिला मंडळाने निषेध आंदोलन करत कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक दिली. अनेक वर्षापासून मुख्य रस्त्यापासून अंतर्गत रस्ता खराब असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता १२ मार्च पर्यंत तत्काळ बनवून द्या अन्यथा १३ मार्च पासून पालिका मुख्यालया बाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आई एकविरा मंडळाच्या सोनी क्षिरसागर यांनी दिला आहे.  

कल्याण पूर्वेत समस्यांचा विळखा असून नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच अडीवली ढोकळी येथील श्री मलंगगड मुख्य रस्त्यापासून राजाराम पाटील नगर येथे जाणारा रस्ता, ऑस्टन नगर येथील रस्ता गेली आठ वर्ष खराब आहे. याच खराब, चिखल्याच्या रस्त्यावरून लहानग्या पासून वृद्धाना पायपीट करावी लागत आहे. असे असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त तसेच संबधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देवून त्याचा पाठपुरावा देखील घेण्यात येत होता. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दाखल घेतली नसल्याने आई एकविरा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पालिका मुख्यालया समोर जाहीर निषेध आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे अध्यक्ष सोनी क्षिरसागर यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या १२  मार्च पर्यंत प्रशासनाकडून रस्त्याचे काम करून देण्याची वाट बघण्यात येणार आहे. असे नाही झाले तर १३ मार्च रोजी पालिका मुख्यालय समोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे सोनी क्षिरसागर यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत