मराठी भाषादिवसा निमित्त ज्ञानेश्वरी पूजन

Views: 551
शेअर करा:

कल्याणत ह.भ.प. बिभिषण महाराज ठाकूर यांचे प्रवचन

कल्याण : २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांच्यावतीने ज्ञानेश्वरी पूजनचा कार्यक्रम व ह.भ.प. बिभिषण महाराज ठाकूर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रभाग क्र. ३६ बैल बाजार येथील जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, राज्य सचिव उर्मिला तांबे, शहर अध्यक्ष शितल विखणकर, कपिल पवार आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबत स्वाक्षरी लेखन यात देखील नागरिकांनी सहभाग घेतला.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत