मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लरवर नि:पक्षपातीपणे कारवाई करावी – केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़l

Views: 701
शेअर करा:

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  आदेशानुसार अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे धडक कारवाई करावी, असे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आज दिले.  या विषयाबाबत परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिका विभागीय उपआयुक्त, कल्याण व डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा.आयुक्त व इतर अधिकारी वर्ग यांचे समवेत आज संपन्न झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी हे निर्देश दिले.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बार, गुटखा पार्लर, ढाबे, टप-या व इतर ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जाते, अशा ठिकाणी त्वरीत कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. या संदर्भात महापालिकेच्या प्रभागातील सहा. आयुक्तांनी यापूर्वीच नोटीसा बजाविल्या असून पुढील कार्यवाही आता सुरु करण्यांत आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 ज्या अनधिकृत बार व तत्सम ठिकाणी पोलीस विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. त्याची यादी त्यांनी महापालिकेस दिली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्र गतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत