महावितरणच्या ढिसाळ कारभारा विरोधात शिवसेना उबाठा गटाची महावितरण कार्यालयावर धडक 

Views: 575
शेअर करा:

कल्याण : महावितरणच्या ढिसाळ कारभारा विरोधात कल्याण पूर्वेतील  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महावितरणच्या टाटा पॉवर येथील  कार्यालयावर धडक दिली. महावितरण विद्युत संर्दभात नागरिकाच्या अनेक तक्रारी येत आहेत.  यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  टाटा पाॅवर नाका येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांची भेट घेत समस्या मांडल्या. यावेळी उबाठा गटाचे   कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, शहर प्रमुख शरद पाटील, माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण,  गणपत घुगे, हेमंत चौधरी, जगदीश तरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

          सद्ध्या पावसाचे दिवस असतांना वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.  सडलेले  खराब झालेले विदूयत पोल  बदलणे,  रस्त्यामध्ये अडथळे निर्माण झालेले विद्युत खांब त्वरीत बदलणे. अनेक ठिकाणी डीपी तुटलेल्या आहेत, झाकणे तुटलेली आहेत. यामुळे  मेोठी दुर्घटना होऊ शकते. मुख्य रस्त्यांवर लाईटचे  वायर लोंबकळत आहेत.

 नेहमी पूर्व सुचना न देता लाईट जाते. अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वायर भुमिगत करणे बाबत निश्चीत धोरण नाही.  लाईट गेल्या नंतर फोन  केला असता फोन उचला जात नाही, तसेच फोन लागला तर उत्तरे मिळत नाहीत.

लाईट बिल ठेकदारा कडून न येणे. ते लाईट बिल  दूसऱ्याच्या घरात टाकणे. अनेक झाड्याच्या फांदया अजूनही विद्युत वायर मध्ये आहेत यामुळे नेहमी स्पार्क  होतो. झाडाच्या फांदया तोडणे तसेच त्या ताबडतोब उचलणे यासाठी ग्राहकांना  विशेष मोबाईल नंबर मिळावा.

अश्या अनेक तक्रारी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या. या तक्रारी लवकरात लवकर दूर न केल्यास  मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत