Views: 688
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत ई बसेस दाखल होऊन बरेच महीने झालेत, पण एक ही बस सेवेत रूजू झाली नाही. सर्व ई बसेस आगारात उभ्या असून भंगार होत आहेत. त्या साठी गुरूवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सह संघटक रूपेश भोईर यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी रूपेश भोईर यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेवर आरोप केले की, जाणूनबूजून परिवहनचे अधिकारी ई बसेसना भंगार करीत आहेत. जेणेकरुन नंतर बसेसना भंगारात विकून आर्थिक मलीदा खाता येईल. रूपेश भोईर यांनी बसेसना भंगारात विकून घेण्यासाठी पंचवीस रूपये प्रति किलोचा भाव देण्याची तयारी दर्शवली. या आन्दोलना वेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक रविंद्र कपोते, अवजड वाहतुक सेनेचे निलेश भोर, राष्ट्रवादीचे दिनेश परदेशी यांच्या समवेत शिवसेनिक उपस्थित होते.
यावेळी परिवहन सेवेचे व्यवस्थापक सावंत यांना ई बस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी निवेदन दिले. सावंत यांनी एका आठवड्यात ई बस सेवा सुरू करण्याची हमी दिली. याप्रसंगी शिवसैनिकांच्या लक्षात आले की परिवहन सेवेच्या आगाराचे उदघाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले होते. पण आता परिवहन सेवेच्या आगारात आदित्य ठाकरे यांच्या नावाची पाटी गायब झालेली आहे. रूपेश भोईर यांनी परिवहन व्यवस्थापकांना इशारा दिली की, आजच्या आज जर पाटी दर्शनी ठिकाणी नाही लावली तर उद्या महापालिका मुख्यालयात एक ही पाटी दिसणार नाही.
याचवेळी एक ऑटो रिक्षा आगारात येताना सर्वांना दिसली. त्या रिक्षात डिझेल वाहतुकीचे चार ड्रम दिसून येत होते. रविंद्र कपोते आणि रूपेश भोईर यांनी याबाबतीत विचारणा केली असता, महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यलयात जनरेटर साठी डिझेल पाठविण्याचे कारण दाखवून अनधिकृत रीत्या खाजगी वाहनात डिझेलची वाहतूक करण्यात येत होती. या बाबतीत लवकरच आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.



