रस्त्याच्या अयोग्य पद्धतीच्या कामामुळे नागरिकांना मनस्ताप कल्याण विकासिनीचे आयुक्तांना पत्र

Views: 664
शेअर करा:

कल्याण : पावसामुळे महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्याचे आणि रस्ताच्या डांबरीकरणाचे काम पालिका क्षेत्रात जोरात सुरु आहे. मात्र काही ठिकाणी हे काम अयोग्य पद्धतीने सुरु असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कल्याण विकासिनीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ऍड. उदय रसाळ यांनी पालिका आयुक्तांना पात्राद्वारे तक्रार केली आहे.

कल्याण पूर्वेतील जे प्रभागातील जुनी जनता बँक ते म्हसोबा चौक सुरु असलेले रस्त्याचे काम अतिशय अयोग्य, व निकृष्ट पध्दतीने सुरू आहे. निष्काळजी पणाने फक्त एकाच आकाराचे दगडे टाकून, रस्तावर नियमानुसार

विविध मापाचे दगड, टाकून रीतसर काम सुरु करण्यापूर्वी उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु एकच साईजचे दगड टाकून त्यावर रोलर फिरवत आहे.त्या आधी रस्त्यावरील खड्डे धूळ माती कोणत्याच पध्दतीने न काढता अर्ध्या रस्त्यावर दगडे पसरवली जात आहे. वारंवार अशा पध्दतीने थर टाकून रस्ता करुन रस्त्यालगतची घरे दुकाने रस्त्याखाली, खड्यात टाकत आहेत. याच मुळे लोकांच्या घरात पावसाळ्यात पाणी जाण्याचे प्रकार घडतात.

याआधी हाच रस्ता दोन वेळा अशाच प्रकारे बनविण्यात आला आहे, अशाच प्रकारे अयोग्य पध्दतीने केल्याने याच रस्त्यावर प्रचंड खड्डे नियमित होत आले आहेत. आता पुन्हा याच प्रकारे अयोग्य प्रकारे रस्ता पुन्हा करण्यात येत आहे. दगड गोटे टाकून तीन ते चार दिवस झालेत लोकांना अतिशय त्रासदायक काम झाले आहे तसेच रस्त्यामध्ये असलेल्या ड्रेनेजचे झाकणे यावर दगड गोटे टाकून त्यावर रोलर फिरविण्यात आला आहे. अशा प्रकारे महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात येत आहे. कोणतीही वर्क ऑर्डर दर्शनी भागावर लावण्यात आली नाही. जबाबदार व्यक्ती उत्तर दयायला नाहीत अशी सर्व परिस्थिती आहे. यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी उदय रसाळ यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत