पर्यावरण दिनी केडीएमसीतर्फे अभिनव निसर्गोत्सवाचे आयोजन

Views: 493
शेअर करा:

कल्याण : या वर्षीच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार २ जून ते ५ जून पर्यंत महापालिकेमार्फत आगळयावेगळ्या निसर्गोत्सव-२०२३ चे आयोजन उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवार २ जून ते ५ जून या कालावधीत केडीएमसी पर्यावरण विभाग व पर्यावरण दक्षता मंडळ, विवेकानंद सेवा मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, श्री लक्ष्मी नारायण संस्था, सोलास इंडिया संस्था यांच्यामार्फत विविध ठिकाणी पर्यावरण विषयक, पथनाट्यद्वारे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहर अभियंता अर्जुन आहिरे, उपायुक्त अतुल पाटील, सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आदी पालिका अधिकारी उपस्थित होते.

रविवारी सकाळी ६ वाजता महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत व शारिरिक स्वाथ्य राखण्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून कल्याण शहरामध्ये सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या सायकल रॅलीचा प्रारंभ बिर्ला कॉलेज येथून सकाळी ६ वाजता होणार असून वालधुनी ब्रिज – विठ्ठल वाडी चौक – आधारवाडी चौक मार्गे बिर्ला कॉलेज पर्यंत सदर सायकल रॅलीची सांगता होणार आहे. या सायकल रॅलीस नागरीकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत एकूण ४०१ सायकलपटूंनी आपली नावे रॅलीसाठी नोंदवीली असून यामध्ये वय वर्षे ६ ते ६९ या वयोगटातील सायकलपटूंचा अंतर्भाव आहे. या सायकलपटूंना रॅलीच्या प्रारंभी टि-शर्टचे वाटप करण्यात येणार असून रॅलीच्या सांगतेनंतर सर्व सायकलपटूंना प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

या सायकल रॅलीत महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र हे उपस्थित राहणार असून या सायकल रॅलीचे आयोजन सायकल उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत यांनी केले आहे.

तर महापालिकेच्या मुख्यालयात “कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव -२०२३ प्रदर्शनाचे” भव्य आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ४ जून  रोजी सकाळी ८ वाजता महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, हे प्रदर्शन ४ व ५ जून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांसाठी विनाशुल्क खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये रोपांची काळजी कशी घ्यावी, स्वयंपाक घरातील कच-यापासून खत निर्मिती, विविध आयुर्वेदिक रोपांची माहिती, निसर्गाशी निगडीत पुस्तके, पर्यावरण पुरक गणेश मूर्ती, सर्प/पक्षी मित्र यांचेमार्फत सादरीकरण, कचरा विलगीकरण, किचन गार्डनिंग यांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत

तसेच महापालिकेचे विविध उपक्रम, विविध संस्था/एन.जी.ओ. मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम एल.इ.डी. वॉलद्वारे प्रसारीत करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिका परिक्षेत्रातील निवडक नर्सरी कडून विविध रोपांची माहिती व स्वस्‍त दरात विक्री असे अनेकविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवारी ५ जून रोजी सकाळी १० वाजता अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याहस्ते कल्याण पश्चिम येथील रिंग रोड, गांधारी ब्रिज जवळ “वृक्षरोपणाचा कार्यक्रम” संपन्न होणार आहे. तसेच संध्याकाळी ४ वाजता कल्याण डोंबिवली मधील सर्पमित्र, वन्यजीव प्रेमी, पक्षीमित्रयांना महापालिकेमार्फत सन्मानित करण्यात येणार आहे.

तरी महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी, निसर्ग प्रेमींनी “कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव – २०२३” मधे सहभागी होऊन महापालिकेतील हरित प्रदर्शनाला व विविध कार्यक्रमांना जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत