राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने 

Views: 477
शेअर करा:

कल्याण : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून झालेल्या अटकेचे पडसाद बुधवारी कल्याणातही पाहायला मिळाले असून पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निदर्शने करण्यात आले. 

     राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक याची बुधवारी ईडीकडून चौकशी सुरू झाली. नवाब मलिक सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले. ८ तासाच्या चौकशीअंती त्यांना ईडीकडून अटक करण्यात आले असल्याचे समोर आल्यानंतर राजकारनात एकच खळबळ उडाली. याचे पडसाद मुंबईसह कल्याणात देखील पाहायला मिळाली आहे. 

     राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन निषेध केला. तसेच भाजपकडून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांची भाजपकडून नाहक बदनामी सुरू असल्याची प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत