Views: 460
कल्याण : एसएसटी महाविद्यालयातील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आपला वेगळा ठसा नेहमीच उमटवित आहेत. याच शृंखलेत नुकतीच भर पडली असून पुन्हा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र यांच्या मान्यतेने महाराष्ट्राच्या खो खो संघात निवड झाली.
महाराष्ट्र खो खो च्या १९ वर्षाखालील संघात एस एस टी महाविद्यालयातील मयुरेश मोरे, काजल शेख, कल्याणी कंक या विद्यार्थ्यांची निवड झाली. या संधीचे सोने करत दिल्ली येथे असेंम्बली खो खो स्पर्धांमध्ये हे महाराष्ट्र मुलींच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले आणि मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेत भारतातून २५ संघांनी आपला सहभाग नोंदविला. महाराष्ट्र संघाच्या सुवर्णमयी कामगिरी साठी एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ सादर करून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या उपलब्धी बद्दल सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



