Views: 488
कल्याण : कल्याण पूर्वेतील प्रस्तुतीगृहाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यालयाच्या गेट जवळ ठिय्या मांडत प्रशासनाने प्रश्न मार्गी न लावल्याने, आक्रमक भुमिका घेत घोषणाबाजी करीत चाँकलेट वाटप करीत सोमवारी निषेध केला.
मनसेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर धडक देत गेल्या पंधरा वर्षा पासून कल्याण पूर्वेतील तळागळातील वर्गातील महिलांसाठी प्रसूतीगृह होत नसल्याने मुख्यालयच्या गेटवर ठिय्या देत चाँकलेट वाटप आंदोलन करीत घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्या दालनात मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या समोर मनसे पदाधिकार्यानी संदर्भीत प्रश्नाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.
कार्यकारी अभियंत्यानी प्रसूतीगृहाच्या निविदा नुसार येत्या पंधरा दिवसांत वर्क आँर्डर एजन्सीला देत काम सुरू होणार असल्याचे आश्वसन दिले. यावर पदाधिकारी यांनी कोरे यांना चाँकलेट देत आश्वासनाची पूर्तता वेळेत करा अशी मागणी लावून धरत लेखी मागणी केली. या मागणीला कोरे यांनी दुजोरा दिल्याने अखेर मनसेच्या चाँकलेट आंदोलनावर तातपुरता पडदा पडला. यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



