Views: 621
कल्याण : अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने नुकतेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन वंजारी भवन कल्याण येथे करण्यात आले होते. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक तसेच छगन जायभाये, चंद्रकांत सांगळे, आत्माराम फडसर, लता पालवे आदींनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच निधन झालेले संस्थेचे माजी खजिनदार गंगाधर गरकळ तसेच छगन जायभाये यांच्या मातोश्री जायभाये आणि चंद्रकांत सांगळे यांचे चुलते बाजीराव सांगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच या कार्यक्रमानंतर संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष रमेश देशमुख, सहसचिव छगन जायभाये, खजिनदार प्रा रामनाथ दौंड, सहसचिव मोहन आव्हाड, बांधिलकी वधू वर शाखेचे अध्यक्ष निवृत्ती घुगे आणि महिला शाखेच्या अध्यक्ष लता पालवे यांचे वाढदिवस साजरे करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिन दराडे, आत्माराम फड, माधव दराडे, पियुष काकड, किरण दराडे, परेश सानप आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.



