लुटारू ज्वेलर्सवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

Views: 433
शेअर करा:

मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांचे पोलीस उपायुक्तांना पत्र

कल्याण : गेल्या काही वर्षात कल्याण डोंबिवली परिसरातील काही ज्वेलर्सकडून आकर्षक भिशी योजनेचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकारात वाढ होत असून या लुटारू ज्वेलर्सवर कारवाई करण्याची मागणी डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पोलीस उपाआयुक्तांकडे पत्राद्वारे  केली आहे. 

     मे. एस. कुमार गोल्ड अँड डायमंड या ज्वेलर्सने २० ते २५ ग्राहकांना तब्बल १ कोटी ५६ लाखाला गंडा घातल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. गोल्ड स्कीमच्या गुंतवणुकीमध्ये माफक दरात सोने व डायमंड देत असल्याचे व त्याकरिता आकर्षक योजनेत गुंतवणूक करण्याचे प्रलोभन ग्राहकांना दाखवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ज्वेलर्स दुकानाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार पिल्लई यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे गुंतवणूकदार कल्याण डोंबिवली मधील सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील असून या आर्थिक फसवणूकीमुळे ते मेटाकुटीला आले आहेत.

 याव्यिरिक्त गुडवीन ज्वेलर्स, व्हि. जी. एन. ज्वेलर्स व आता एस. कुमार ज्वेलर्स हे मोठे मोठे ज्वेलर्स करोडो रुपयांचा अपहार करून गायब झाले आहेत. या फसवणूक करणाऱ्या ज्वेलर्सवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा नाईलाजास्तव सर्व बाधीत व फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना बरोबर घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरात यांनी गुरुवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिला आहे.

      याबाबत महात्मा फुले पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्याशी संपर्क केला असता यासंदर्भात तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत