लोकलमध्ये चाकूच्या धाकाने प्रवाशांची लूट

Views: 445
शेअर करा:

कल्याण : लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ बहिणीला चाकूचा धाक दाखवून त्यांची लूट करण्यात आली. दोघांकडे असलेला मोबाईल, बॅग खेचून चोरटे पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. या चार चोरट्यांपैकी एका चोरट्याला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

शहाड रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला असून या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. संजू उर्फ सोनू मस्तान राऊत असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल दाखल आहेत. गेल्या काही काळापासून आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित भाऊ बहीण आंबिवली रेल्वे स्थानकाहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. आंबिवलीहून लोकल सुरू होताच लोकलमध्ये गर्दी नसल्याची संधी साधत चार तरुण त्यांच्याजवळ आले. यामधील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत या दोघांजवळील बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतले. इतक्यात शहाड रेल्वे स्टेशन आले आणि या चारही तरुणांनी ट्रेनमधून उतरून पळ काढला. दोघा भाऊ बहिणीने आरडाओरड केल्याने स्टेशनवरील प्रवाशांनी सतर्कता दाखवली आणि पळून जाणाऱ्या एका चोरट्याला पकडलं, मात्र त्याचे तिघे साथीदार निसटण्यात यशस्वी ठरले.

या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजू उर्फ सोनू मस्तान राऊत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोध घेत आहेत. सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अटक आरोपी संजीव आणि फरार आरोपी छोटू पापा यांच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र रेल्वेत अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत