सारंग केळकर “युवा कला गौरव” पुरस्काराने सन्मानित

Views: 455
शेअर करा:

पुण्यातील आर्ट बिटस् फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार

कल्याण : कल्याण मधील युवा चित्रकार सारंग केळकर याला “युवा कला गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून चित्रकला या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार पुण्यातील आर्ट बिटस् फाउंडेशन तर्फे हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.

सारंग केळकर यांची एक नवोदित चित्रकार म्हणून या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.

Happy
Happy
88 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
13 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत