लोकाभिमुख प्रकल्प देण्याचे काम आपले सरकार करत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Views: 391
शेअर करा:

कल्याण : लोकाभिमुख प्रकल्प देण्याचे काम आपले सरकार करत आहे. हे विकसकाम करणारे सरकार आहे,  मुख्यमंत्री तुमचाच आहे. कष्टकारी लोकांमधील संकट दूर होऊन ते सुखी झाले पाहिजे,  सर्व सामान्य हिताचे निर्णय घेतले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी कल्याण पश्चिमेतील विविध प्रकल्पांच्या लोकार्पण वेळी दिली.

      कल्याणमधील प्रबोधनकार ठाकरे सरोवरातील मा. स्व. बाळा साहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेत नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार सरोवराच्या नुतनिकरणाच्या कामाचे लोकार्पण केले. यावेळी सरोवरात लेझर शो चे देखील लोकार्पण करण्यात आले. या सरोवरात सुरु झालेला लेझर शो हा राज्यातील दूसरा लेझर शो आहे. बीएसयुपी प्रकल्पतील प्रकल्प ग्रस्तांना चावी वाटप करण्यात आले. मलशुद्धिकरणा केंद्राचे लोकार्पण डिजिटल पद्धतीने यावेळी करण्यात आले. तसेच केडीएमटी अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी आदेशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांगांना व्हिलचेअरचे वाटप कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण मैदानात करण्यात आले. 

   यावेळी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड़, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रेय शिंदे, पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, पालिका सचिव संजय जाधव, शहर अभियंते अर्जुन आहिरे आदींसह माजी नगरासेवक नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कल्याण शहर शाखे तर्फे मुख्यमंत्र्यांचे सत्कार करण्यात आला. 

   कल्याण मध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारावे, यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. कल्याणमधील प्रबोधनकार ठाकरे सरोवर हा  ऐतिहासिक तलाव असून या ठिकाणी ज्या अधिक सुविधा करता येतील त्या कराव्यात असा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि म्हणून ते देण्याचं काम आज कल्याण डोंबिवलीमध्ये झालं आहे. मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआरला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे ही आपली भूमिका आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे एमएमआर रिजन मधील रस्ते देखील खड्डे मुक्त करू, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.     

बीएसयूपीच्या घरे वाटप होत आहे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे.  ही घरे चांगली असून येथे सर्व सुविधा आहेत पायाभूत सुविधांसह नागरिकांना समाधानाचे आयुष्य जगता यावे, त्यांचे स्टॅंडर्ड ऑफ लिविंग वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

राज्य सरकार व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याण मध्ये चांगले काम होत आहे. अथक प्रयत्नांनंतर बीएसयुपीची घरं आज पात्र लाभार्थ्यांना मिळत आहेत, प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या सुशोभीकरणामुळे,  लोकार्पण सोहळ्यामुळे कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे उद्गार केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात काढले.तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी, प्रकल्प ग्रस्तांचा बीएसयुपी मध्ये मोफत घराचा प्रश्न खासदार श्रीकांत शिदे यांनी मार्गी लावल्या बद्दल कौतुक करीत पिण्याच्या पाण्यासाठी कल्याण डोंबिवली मनपासाठी स्वतंत्र धरण असावे अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करीत शहराचा चेहरामोहरा बदलणारे रस्ते, रिंग रूट या विकास कामाचे कौतुक केले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत