Views: 378
कल्याण : क्रांतीकारी युग पुरुष, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा उपस्थित राहुन मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली.
याप्रसंगी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुन्हाडे, प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रचालन) सतिश चव्हाण, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी यशवंत जाधव, महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, उप सचिव प्रमोद शिंदे, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनिल राठोड, प्रभारी, सुनिल राठोड उप उद्यान अधिक्षक, डॉ. राजूसिंग राठोड वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, अॅड प्रकाश चव्हाण, डॉ. व्यकटेश राठोड, भास्कर राठोड, सरला राठोड, मिनाक्षी राठोड, अविनाश राठोड, विशाल राठोड, निरीक्षक (बाजार), धर्मा राठोड तसेच विभागीय कामगार कल्याण अधिकारी दिलीप राठोड, वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन) निलेश पवार, शेषराव राठोड, श्रीकांत पवार, सुखलाल चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


