वाचन प्रेरणा दिनामुळे मातृभाषेचा खऱ्या अर्थाने आनंद – अति. आयुक्त मंगेश चितळे

Views: 435
शेअर करा:

कल्याण :  वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने मातृभाषेचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगता आला असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिकेचे अति.आयुक्त मंगेश चितळे यांनी गुरुवारी काढले. शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत महापालिकेने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी,कर्मचारी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सर्वभाषिक विद्यार्थी यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून विविध स्पर्धांचे, उपक्रमांचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळयासमयी बोलतांना अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी हे उद्गार काढले आणि महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱी वर्गाने उत्स्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले.

वृत्तपत्रीय मथळा स्पर्धा, गद्य वाचन स्पर्धा, बोली भाषा स्पर्धा, स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, स्वरचित चारोळी स्पर्धा, स्वलिखित घोषवाक्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणी, वाक्प्रचार व सुविचार लेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन वाचन प्रेरणा महोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आले. या स्पर्धामध्ये महापालिकेच्या वर्ग-१, वर्ग-२ च्या अधिका-यांनी आणि वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांनी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सुमारे ४०,००० विदयार्थी-विदयार्थीनींनी सहभाग घेतला.

या स्पर्धाचा पारितोषिक वितरण सोहळा आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात संपन्न झाला. या वितरण पारितोषिक सोहळयाप्रारंभी कल्याण मधीलच कदम कुटुंबीयांच्या “कुटुंब रंगले वाचनात” या उपक्रमाबाबत कदम कुटुंबियांशी महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी रंगतदार चर्चा केली. या चर्चेमध्ये कदम कुटुंबीयांनी त्यांच्या वाचनाच्या प्रचाराबाबत आणि त्यामुळे इतरांनाही लागलेल्या वाचनाच्या गोडीबाबत उपस्थिताना माहिती दिली.

या स्पर्धामध्ये महापालिकेचे वर्ग-१, वर्ग-२ चे अधिकारी देखील सहभागी झाल्यामुळे उत्सुकता व जिज्ञासेपोटी शहर अभियंता अर्जुन अहिरे, सर्व उपआयुक्त, कार्यकारी अभियंता, सहा. आयुक्त अशा वरिष्ठ अधिका-यांनी देखील या समारोहा मध्ये आवर्जुन आपली उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिका सचिव संजय जाधव यांनी केले व सुत्र संचालन दत्तात्रय लदवा व महेश देशपांडे यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत