Views: 341शिवकालीन नृत्याच्या माध्यमातून लिटिल जिनियस प्रि स्कुलमध्ये स्वसंरक्षणाचे धडे
कल्याण : कल्याण नजीक बापगाव येथील लिटिल जीनियस प्री स्कूल मध्ये नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सम्राट अशोक स्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष रंगोत्सव सेलिब्रेशन शरद घोलप, इव्हेट डायरेक्टर कल्याण नितीन मोढवे, प्री प्रेस मुंबई व्यवस्थापक आनंद थुळे, वृंदावन सोसायटी अध्यक्ष दादासाहेब बोंद्रे, सचिव राजेश चौधरी व खजिनदार संतोष शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रत्येक वेळेस लिटिल जीनियस प्री स्कूलच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमांमध्ये विविध स्वरूपाचे समाज प्रबोधन म्हणजे समाजाला संदेश असे डान्स परफॉर्मन्स, बक्षीस वाटप करत असतात. तसेच यावर्षी देखील सध्याच्या काळानुसार स्त्रियांवर व मुलींवर अत्याचार होतो त्यासाठी काळानुसार मुलींना सशक्त आणि स्वावलंबी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांना कराटे यामध्ये पारंगत करून स्वतःचे आत्मसंरक्षण करावे यासाठी गाण्याच्या परफॉर्मस च्या माध्यमातून त्यांना संदेश देण्यात आला. तसेच शिवकन्या आर्वी कुंभार हिनेदेखील शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले.
तसेच समाजाला एकात्मता याचा संदेश देण्याचा प्रयत्न सीनियर केजीच्या मुलांनी केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका संचिता शिंदे यांनी स्कूलच्या प्रगतीविषयी सांगितले आणि स्कूल संदर्भात मुलांना कसे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे काळजी कशी घेतली जाते यांच्या संपूर्ण प्रस्तावना त्यांनी मांडली. यावर्षी कराटे अबॅकस याच्या माध्यमातून मुलांना नवीन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे हे देखील आवर्जून सांगितले. पालकांकडून पण खूप सुंदर रित्या प्रतिसाद मिळाला यावर्षी पालकांनी देखील आवर्जून स्टेजचा वापर करून आपल्यातले कलागुण सादर केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रामुख्याने वनिता भोर, आरव शिंदे आणि गणेश यांनी केले.



