Views: 605
भाजप माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांचा स्तुत्य उपक्रम
कल्याण : समाजातीत काबाडकष्ट करणाऱ्या नागरिकांना पावसात काम करणे सोयीचे व्हावे यासाठी भाजप माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांनी छत्रीचे वाटप करत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय हे केवळ कार्यालय नासून ते जनसेवेचा वसा घेतलेले मराठी माणसाचे हकाकाचे माहेरघर असल्याचे विश्वदीप पवार यांनी सांगितले.
समाजामध्ये काबाडकष्ट करणारा वर्ग खूप मोठा आहे. पोस्टमन, सोसायट्यांमध्ये पाणी सोडणारे, झाडू मारून साफसफाई करणारे, घरकाम करणाऱ्या महिला, चहावाले, रस्त्यावर हार फुले विकणारे, इस्त्रीचे कपडे घरोघरी जाऊन देणारे, दळण दळणारे, भाजी विक्रेते असे अनेक व्यक्ती जे स्वताचे घर चालवण्यासाठी उन्ह, वारा, पाऊस झेलून आपले काम निरंतर सुरु ठेवतात अशा काबाडकष्ट करणाऱ्याना त्यांचे काम सोयीचे होण्यासाठी छत्री वाटप करत केले आहे. हा स्तुत्य उपक्रम भाजपचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांनी राबवला आहे. त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.



