Views: 550
कल्याण : मध्यवर्ती पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या प्रयत्नाने लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा -पॉक्सो तसेच बाल न्याय कायदा मधील गुन्ह्या मध्ये पोलिसांचा तपास, इतर प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्व या विषयावर मार्गदर्शन पर सत्र आयोजित करण्यात आले होते.
ऍड. तृप्ती पाटील यांनी या सत्रामध्ये उपयुक्त माहिती देऊन उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तपासा दरम्यान येणाऱ्या अडचणी आणि न्यायलायीन प्रक्रिये साठी कशी तयारी असावी किंवा चार्जशीट सादर करते वेळी घ्यायच्या खबरदारी ह्यावर मार्गदर्शन करत इतर प्रश्नांची उत्तरे दिली. काही प्रशासकीय अडचणी आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी बद्दल वपोनी कड यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील ८ अधिकारी आणि ४० कर्मचारी ह्या सत्रासाठी उपस्थित होते.
हे सत्र घेण्या मागचा उद्देश आणि परिचय वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. महिला पोलिस निरीक्षक शितोळे यांनी ऍड तृप्ती पाटील यांचे पुषपगुच्छ देऊन स्वागत केले आणि आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक महेश बंडगर यांनी केले.



