Views: 477
कल्याण : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या शिवसेना आणि महाविकासआघाडीचा जाहीर निषेध करण्याकरिता डोंबिवली पूर्व अप्पा दातार चौक येथे भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सावरकर रोड या ठिकाणचा प्रभाग सावरकर नावाने होता तो यांनी काढून टाकला आहे. यांचे सावरकर प्रेम बेगडी आणि खोटं आहे. शिवसेनेचा विचार हा हिंदुत्ववादी विचार राहिलेला नाही. तर तो पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या तालावर नाचणारा पक्ष झाला आहे हे नागरिकांना कळून चुकलं आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या वतीने देण्यात आली.



