हातगाड्यांवर सिलेंडर वापरा विरोधात केडीएमसी आक्रमक

Views: 537
शेअर करा:

विशेष पथकाच्या माध्यमातून बारा तासात 28 पेक्षा अधिक अनधिकृत सिलेंडर केले जप्त

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्वाचा झाला आहे. अलीकडेच एका चायनीजच्या टपरीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना घडली. त्यानंतर पुन्हा एकदा बेकायेशीररित्या सिलेंडर आणि त्याची सुरक्षितता हे विषय समोर आले आहेत. या पार्श्भूमीवर कल्याण डोंबिवली महानगरालिकेच्या आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणा-या सिलेंडर वर कारवाईला सूरवात झाली आहे.

केडीएमसीच्या क प्रभाग क्षेत्रात आतापर्यंत २८ बेकायदेशीरपणे असलेले सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.  कारण अशा सिलेंडर मुळे रस्त्यावरील नागरिक आणि इतर ठिकाणीही सुरेक्षेचा मुद्दा उपस्थित होतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या सिलेंडरचा पुरवठा करणा-या गॅस एजंसी वर सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल अशी माहिती क प्रभाग सहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी दिली. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत