डोंबिवलीत वृक्षारोपणासह वृक्ष नामकरण आणि स्वच्छता अभियान

Views: 416
शेअर करा:

डोंबिवली : कर्नाटक संघाच्या मंजूनाथ वाणिज्य महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा संघ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संंयुक्तविद्यमाने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण, वृक्ष नामकरण आणि स्वच्छता अभियान, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छता अभियानाला केडीएमसीच्या फ/6 प्रभागाचे सहाय्यक आयुक्‍त राजेश सावंत यांचे सक्रिय सहकार्य लाभले होते. तर डॉ. सुशिला विजयकुमार यांच्यासह मंजुनाथ वाणिज्य महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व इतर शिक्षक समूहाने महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. यावेळी प्लॅस्टिक पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्यांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ९० फिट रस्त्यावर असलेल्या भाजी बाजारात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यात केडीएमसीसह पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले, राष्ट्रिय सेवा संघाचे प्रा. पुष्कर देशपांडे, प्रा. दिलीप नाझीरकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सदस्या प्रा. निशा देवधर, प्रा. माधुरी महाराव, प्रा. शमिका भगत, प्रा. प्राजक्ता सापुते यांच्यासह माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्वच्छता अभियानाला महाविद्यालयाच्या प्रांगणापासुन आरंभ झाला व समारोप खंबाळपाडा कमानीजवळ झाला. पर्यावरण दक्षता मंचच्या डॉ. श्रेया भानप यांच्यासह वनस्पती तज्ज्ञांचे वृक्षनामकरण उपक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्वांच्या सहभागासह सहकार्याने जागतिक वसुंधरा दिन यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत