Views: 379
कल्याण : कल्याण रामबागेतील ४९ वर्षीय महिलेची सोनसाखळी चोरी करुन चोरटे पसार झाले होते. ११ जून रोजी ही घटना घडली होती. या चोरी प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक आरोपींच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात १५ गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून सोने आणि मोटासायकल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.
अटक आरोपींची नावे रिजवान इस्माईल शेख आणि मोहमंद आलम असलम कुरेशी या दोघांना सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. दोघेही मुंब्रा शिळफाटा येथे राहणारे आहे. घटना घडल्यापासून अवघ्या आठ दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींचा रिमांड घेऊन त्यांच्याकडून अन्य गुन्ह्याची उकल केली आहे. त्यांच्याकडून १० ग्रॅम वजनाचे पाच लाख रुपयांचे सोने आणि चार मोटार सायकल जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मोटार सायकलची किंमत ६ लाख ९० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हि कामगिरी महात्मा फले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाने यांच्या देखरेखीखाली पोनि प्रदिप पाटील, सपोनि देविदास ढोले, दिपक सरोदे, पोहवा भालेराव, निकाळ, भालेराव, सोनवणे, भावसार, पोना ठिकेकर, पोशि बरफ, पोना मधाळे, भोईर, कांगरे, गामणे, चित्त, चौधरी, जाधव, भालेराव, हासे यांनी केली आहे



