“राम कृष्ण हरी” हरिनाम सप्ताह सोहळ्यात आमदार राजू पाटील यांची उपस्थिती

Views: 446
शेअर करा:

गळ्यात टाळ, मुखी राम कृष्ण हरी नामाचा जप करत आमदार पाटिल रिंगण सोहळ्यात सहभाग तर ठाणे, रायगड जिल्ह्यातील वारकरी भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित

कल्याण : मलंगगडाच्या पश्चिमेला असलेल्या कुंभार्ली येथे “वसुधैव कुटुम्बकम्” पीठ यांच्या वतीने राम कृष्ण हरी  नामजप संकीर्तन पर्व सुरु आहे. या सोहळ्याला बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात आमदारांनी गळ्यात टाळ, मुखी “राम कृष्ण हरी” जप करत आध्यात्मिक पिठाच्या आवारातील रिंगण सोहळ्यात सहभाग देखील घेतला आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वसुधैव कुटुम्बकम्” पीठाकडून गेल्या १४ वर्षांपासून “राम कृष्ण हरी” जप सोहळा आयोजित करण्यात येत असतो. या पिठाचे आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री अनेक वर्षांपासून तरुणांना अध्यात्माचे धडे हे मोफत देत आहेत. या अध्यात्मिक पिठात वर्षाच्या बाराही महिने देशभरातील अध्यात्मिक संत हे भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी येत असतात. मलंगगडावर जाणाऱ्या ललिता पंचमी उत्सवात या आध्यत्मिक पिठातील विद्यार्थ्यांची दिंडी आणि वेशभूषा हि उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते. बुधवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यक्रमात सहभागी झाले.

  यावेळी आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख ह.भ.प. अजय महाराज पाटील, महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे डोंबिवली शहर संघटक तकदीर काळण, अंबरनाथ तालुका अध्यक्ष नकुल पावशे, नाऱ्हेण ग्रामपंचायतीचे सरपंच समीर भंडारी यांसह ठाणे व रायगड जिल्ह्यातील वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत