Views: 869
कल्याण : २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिना निमित्त मी कल्याणकर सामाजिक संस्थेमार्फत २७ फेब्रुवारी रोजी मराठी शब्दकोडे स्पर्धा व मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे “आयोजन करण्यात आले आहे.
दोन्हीही स्पर्धा एकाच वेळी घेण्यात येणार असून प्रवेश फी नाममात्र एक रुपया असेल. स्पर्धेची वेळ २७ तारखेला सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत असेल. अर्ज करण्याची शेवटची मुदत २६ फेब्रुवारी पर्यंत असून हि स्पर्धा सर्व वयोगटातील महिला पुरुष व सर्व भाषिकांसाठी असेल. विजेत्यांना बक्षीस म्हणून झाड लावलेली आकर्षक कुंडी सजावटी सह मिळेल. ज्यात रुद्राक्ष, कापूर, मिंट (ज्यापासून विक्स बनते), तुळस, ईलायची, लवंग, तेजपत्ता, जायफळ आदी झाडांचा, रोपांचा समावेश असेल.
हि स्पर्धा ऑक्सिजन पार्क, स्वामी विवेकानंद शाळेच्या मागे, गणेशवाडी, कल्याण (पूर्व) या ठिकाणी होणार असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुळकर्णी सर – ९६१९५३८२८८, नितीन निकम – ९८६९५१८९१४, प्रशांत मोरे – ९०२९११२४२५ यांना संपर्क करण्याचे आवाहन मी कल्याणकर सामजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी केले आहे.



