रेरा प्रकरणात एसआयटीने केली ५ जणांना अटक

Views: 511
शेअर करा:

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महारेरा कार्यालयाच्या बनावट परवानगी विक्री करून गोरगरीबांची व शासनाची फसवणुक केली जात आहे. या प्रकरणात एसआयटीने ५ जणांना अटक केली असून यामध्ये प्रियंका रावराणे (मयेकर), प्रविण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदिप त्रिभुवण आणि  कैलास गावडे यांचा समावेश आहे.  

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केडीएमसी अधिकार्यांची खोटी सही शिक्के वापरत अनेक बिल्डरांनी इमारतीच्या परवानग्या मिळविल्या. त्याच परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेतले. वास्तू विशारद संदीप पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणात डोंबिवलीत एकूण ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला.

महानगरपालिकेचा विकास अधिभार बुडविला गेल्याने शासनाची आणि सर्व सामान्य जनतेची फसवणुक केली असल्याने अशा अनाधिकृत बांधकाम करणारे भुमाफिया सक्रिय असल्याने निष्पण झाले. या गुन्हयाच्या तपासामध्ये बनावट बांधकाम प्रमाणपत्राचा वापर करून अनाधिकृत विकास कामे करणारे जमिन मालक, विकासक, कंत्राटदार यांची माहिती मिळवुन प्रत्यक्षात बनावट बांधकाम प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे महारेरा प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सदर गुन्हयामध्ये भुमीका असल्याचे निष्पण झाले त्यावरून प्रियंका रावराणे (मयेकर), प्रविण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदिप त्रिभुवण, कैलास गावडे या आरोपीनां आज अटक करण्यात आली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत