सुसज्ज काळा तलाव कल्याणकरांसाठी नवीन वर्षाची भेट – खासदार कपिल पाटील

Views: 633
शेअर करा:

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या काळा तलावाची केली पहणी 

कल्याण : कल्याण या शहराला ऐतिहासिक शहर म्हणून अशी ओळख असून काळा तलावाला देखील एक वेगळी ओळख आहे. कल्याणकराना या तलावाचे आकर्षण नेहमी राहिले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालीकेने या तलावाच्या सुशोभिकारानाचे काम हाती घेतले आहे. मात्र हे गेले अनेक दिवस तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. याच पर्श्वभूमीवर तलावाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांनी डिसेंबर अखेरपर्यंत काळा तलावच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणार असून सुसज्ज काळा तलाव काल्याणकरांसाठी नवीन वर्षाची भेट असणार असल्याचे यांनी सांगितले.  

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉ. लि. मार्फत काळातलाव व परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरु असून आज सकाळी ७ वाजता केंद्रीय राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांनी पाहणी केली. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, पालिका शहर अभियंते अर्जुन अहिरे, स्मार्ट सिटीचे पालिका अधिकारी तरुण जुनेजा, कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेविका वैशाली पाटील, माजी नगरसेवक दया गायकवाड आदींसह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच नियोजनबद्ध विकास काळातलावाचा झाला आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता असा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या शब्दावर या तलावाचा गाळ काढून विद्यमान मुख्यमंत्री यांनी सुशोभिकारांचा पुढाकार घेतला. तेव्हा पासून हा तलाव सुशोभित व्हावा अशी भावना कल्याणकरांची होती. महणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. सुशोभिकरनाचे काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. काम पूर्ण झाल्यावर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत न राहता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा अशी भावना खासदार पाटील यांनी व्यक्त केली.  

दरम्यान काळा तलावाचे सुशोभीकरण करत असताना तलावा लगत काही नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांचा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये कशा प्रकारे समाविष्ट करता येयील का बाबतात पालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तसेच या नागरिकांना बीएसयुपी योजनेत समाविष्ट करता येयील का याबाबत आयुक्त दांगडे यांना पत्र देण्यात आले असल्याचे खासदार पाटील यांनी तलावाच्या पाहणी वेळी सांगितले.  

सुशोभित काळा तलावात काय असणार ? 

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत काळातलाव कामा अंतर्गत ऑक्टॅगनल जेट्टी, म्युझिकल फाऊंटन, कॅफेटेरिया, स्टेप्स् सिटींग तसेच लॅण्डस्केपिंग अशी विविध कामे प्रस्तावित आहे. यात अष्टकोनी पॅव्हिलियनसह जेट्टी चा समावेश आहे. तलावाच्या पहिल्या टप्प्याचे सुशोभीकरणात तलाव घाट, कॅफेटेरिया, वॉच टॉवर, म्युझिकल फव्वारा विकासासह आणि लॅण्डस्केपिंग इत्यादींच्या समावेश आहे. मुख्य प्रवेशद्वार, तलाव घाटचे बांधकाम, कॅफेटेरिया आणि योगा रूम आदींचा समावेश आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत