Views: 422
कल्याण : येथील पश्चिमेतील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णकृती पुतळा उभारावा यासाठी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथी निमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव संजय जाधव यांना सावित्रीबाई फुले शिक्षण सहायक मंडळाच्यावतीने लेखी निवेदन देऊन करण्यात आली.
कल्याण डोंबिवली मध्ये सुरु असलेल्या स्मार्ट सिटी मध्ये प्रकल्पात महात्मा फुले स्मारक व तेथील जागा बाधित होत आहे असे कळते. तरी महात्मा फुले स्मारक यांच्या मागील मोकळी जागेमध्ये स्मारक स्थलांतरित करून तेथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले यांचा पूर्णकृती पुतळा व्हावा अशी इच्छा कल्याणकारांची आहे.
सद्यस्थितीत असलेल्या स्मारकाची साफसफाई नीट होत नाही व तेथे गर्दुल्ले येऊन बसतात. तेथे तात्काळ एक सुरक्षारक्षक नेमावा ही विनंती याप्रसंगी करण्यात आली. या सर्व बाबी त्यांना लक्षात आणून देत या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष एन जी माळी, सेक्रेटरी एस आर महाजन व स्थानिक फुलबाग विभागीय उपाध्यक्ष प्रशांत माळी व सर्व ज्येष्ठ संचालक, माजी अध्यक्ष, पदाधिकारी व समाज बांधव, महिला भगिनी उपस्थित होत्या.



